VIDEO - प्रवाशांनी महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं
By Admin | Updated: August 10, 2016 16:24 IST2016-08-10T16:24:37+5:302016-08-10T16:24:37+5:30
सर्तक प्रवाशांनी मंगळवारी ट्रेनखाली आत्महत्या करायला निघालेल्या एका महिलेला वाचवलं.

VIDEO - प्रवाशांनी महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सर्तक प्रवाशांनी मंगळवारी ट्रेनखाली आत्महत्या करायला निघालेल्या एका महिलेला वाचवलं. विक्रोळीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या रुळावर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. नाझीया सय्यद असे या महिलेचे नाव आहे.
घरात आईबरोबर झालेल्या भांडणामुळे नाझीयाने आत्महत्येचा निर्णय घेतला. समोरुन ट्रेन येत असताना नाझीया प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या रुळावरुन चालत येत होती. तिला स्टेशनवरच्या लोकांनी हटकले मात्र नाझीयाने आपले चालणे चालूच ठेवले.
अखेरीस दोन युवक आणि महिला पोलिस सुमित्रा पडवी यांनी रुळावर उतरुन नाझीयाला ट्रॅकच्या बाहेर खेचून तिचे प्राण वाचवले. आणखी काही सेकंदांचा विलंब झाला असता नाझीया आपल्या प्राणाला मुकली असती. काही दिवसांपूर्वी नाझीयाचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तणावाखाली असलेल्या नाझीयाने हे पाऊल उचलले.