VIDEO - पार्टी विथ डिफरन्स - भाजपा कार्यालयातच तिकिटासाठी मागितले 2 लाख
By Admin | Updated: February 4, 2017 15:27 IST2017-02-04T15:13:51+5:302017-02-04T15:27:57+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 4 - महापालिका निवडणुकीत भाजपाकडून पैसे घेऊन तिकीटांची विक्री होत असल्याच्या आरोपांना बळ देणारे एक ...

VIDEO - पार्टी विथ डिफरन्स - भाजपा कार्यालयातच तिकिटासाठी मागितले 2 लाख
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 4 - महापालिका निवडणुकीत भाजपाकडून पैसे घेऊन तिकीटांची विक्री होत असल्याच्या आरोपांना बळ देणारे एक प्रकरण समोर आले आहे. नाशिकमध्ये भाजपा कार्यालयातच तिकीटासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नाशिकमध्ये भाजपाच्या तिकीटासाठी कार्यालयीन कार्यकर्ते 2 लाख रुपयांची मागणी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. पक्ष कार्यालय, नेत्यांच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांनी निदर्शने करुन पैसे घेऊन तिकीटे विकल्याचा आरोप केला होता.
नाशिकमधल्या व्हिडीओमुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणवणा-या भाजपाला धक्का बसला आहे. या व्हिडीओमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, मनसेसह सर्वच पक्ष यावरुन भाजपाला घेरण्याची एकही संधी सोडणार नाहीत. महत्वाच म्हणजे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीच या प्रकरणाला वाचा फोडली असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
https://www.dailymotion.com/video/x844qdl