VIDEO : उघडयावर शौचास जाणा-यांचे विद्यार्थ्यांनी ‘टाळया’ वाजवून केले स्वागत

By Admin | Updated: September 8, 2016 15:32 IST2016-09-08T15:13:11+5:302016-09-08T15:32:49+5:30

वाशिम तालुक्यातील तामसी येथे विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून उघड्यावर शौचास जाणा-यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

VIDEO: Open-ended students welcomed the 'avoidance' by the students | VIDEO : उघडयावर शौचास जाणा-यांचे विद्यार्थ्यांनी ‘टाळया’ वाजवून केले स्वागत

VIDEO : उघडयावर शौचास जाणा-यांचे विद्यार्थ्यांनी ‘टाळया’ वाजवून केले स्वागत

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ -  जिल्हा परिषदेच्यावतीने भेटीगाठी स्वच्छतेसाठीसह जिल्हयातील हागणदारी मुक्त करण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे करीत असतांना अनेक गावात आजही उघडयावर शौचास जाणे सुरुच असल्याने वाशिम तालुक्यातील तामसी येथे विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून ‘गोदरी’च्या रस्त्यावर ( शौचास जातात ती जागा) उभे राहून रिंगण तयार केले ज्याचे नाव पथकाने ‘मानवी साखळी’ ठेवले. जे व्यक्ती उघडयावर शौचास जाण्याकरिता निघाले त्यांचे ‘टाळया’ वाजवून स्वागत केले. यामुळे उघडयावर जाणाºया व्यक्ति चांगलेच खजिल झाल्याचे दिसून आलेत.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत असलेले शिक्षक आणि स्वच्छता अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांनी उघडयावर शौचामुळे होणारे परिणामाबाबत माहिती दिली. सदर प्रकार पाहून उघडयावर शौचास जाणारे काही लोक डबा घेवून परतूनही गेल्याचे दिसून आले. सदर बाब गावात पसरल्याबरोबर अनेक ग्रामस्थांनी तेथे येवून गर्दी केली तेव्हा  स्वच्छता पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी हातात डफडे घेवून ऐका हो ऐका... म्हणत स्वच्छ गावाबाबत जनजागृती केली.
 
 

Web Title: VIDEO: Open-ended students welcomed the 'avoidance' by the students