VIDEO : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 15:22 IST2016-08-08T15:22:14+5:302016-08-08T15:22:42+5:30
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाजार समित्या सव्वा महिन्यापासून बंद असल्याने कांदा सडू लागला आहे.

VIDEO : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव ठप्प
नितीन बोरसे
सटाणा (नाशिक), दि. ८ - आडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी पुकारलेला बंद, आडत मुक्तीचा स्वागताहर्य निर्णय घेतला खरा पण गोनी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद अशा परिस्थिती सरकारचे मौन ,विरोधी बाकावरील मंडळीची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंद मुळे साठवलेला कांदा सडू लागला आहे तर काहींचे वजन घटून लागले आहे.आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो काढण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.
दरम्यान यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी अभूतपूर्व तीव्र पाणी टंचाई मुळे लागवडीच्या पस्तीस टक्के कांदा अक्षरश: कांदापीक अर्धवट सोडून द्यावे लागले त्यातच अवकाळी पाऊस ,गारपीटचे ग्रहण ,पंचेचाळीस अंश पर्यंत चढलेला पारा यामुळे उर्विरत कांदा साठवण क्षम आहे की नाही याबाबत प्रश्न चिन्ह असतांना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तिवली जात आहे.
नाशिक जिल्यातील बागलाण ,मालेगाव ,देवळा ,कळवण ,चांदवड ,निफाड ,सिन्नर ,दिंडोरी ,येवला ,नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात .खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते .उन्हाळ कांदा राज्याच्या उत्पादनाच्या चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो . यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर ,येवला ,चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्र मण ,अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे.याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती.त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली .मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली.तर उर्विरत क्षेत्रावरील कांदा पिक एन जोमात असतांना प्रचंड तापमान ,त्यात अवकाळी पाऊस आण िगारपीटच्या फेर्यात सापडल्याने ते पिक जरी निघाले असले तरी ते साठवण क्षम नसल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.तरी देखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे.