VIDEO : डोंबिवली महापालिका कार्यालयात रंगली कर्मचाऱ्यांची 'ओली' पार्टी
By Admin | Updated: October 18, 2016 09:54 IST2016-10-18T09:08:01+5:302016-10-18T09:54:41+5:30
डोंबिवलीच्या ग प्रभाग कार्यालयात पुन्हा एकदा दारूची पार्टी झोडण्यात आल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला.

VIDEO : डोंबिवली महापालिका कार्यालयात रंगली कर्मचाऱ्यांची 'ओली' पार्टी
डोंबिवली, दि. १८ - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील ड प्रभागात कर्मचार्यानी दारुची पार्टी केल्याची घटना जुलैमध्ये घडली असताना डोंबिवलीच्या ग प्रभाग कार्यालयात पुन्हा एकदा दारूची पार्टी झोडण्यात आल्याचा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला आहे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ग प्रभाग अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फेरिवाला हटाव पथकातील ३ - ४ कर्मचाऱ्यांची दारूची जोरदार पार्टी सुरु होती तळ मजल्यावर असलेल्या भांडारगृहात ही पार्टी सुरु होती सदर ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिटे-थोटके, दारूने भरलेले ग्लास, भाजलेल्या चण्यांचा चाकना, आदी साहित्य आढळून आले आहे मात्र या कर्मचाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत. विशेष बाब म्हणजे बाहेरुन कुलुप लावण्यात आले होते आणि कर्मचारी आत दारुची पार्टी झोडत होते.