VIDEO : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा सुरू

By Admin | Updated: August 12, 2016 11:30 IST2016-08-12T10:44:29+5:302016-08-12T11:30:45+5:30

नृसिंहवाडी(शिरोळ) येथे शुक्रवारी सकाळी करवीर पीठाचे शंकराचार्यांच्याहस्ते उत्सव मुरतीवर कृष्णा गंगे स्नान होऊन कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याला सुरवात झाली.

VIDEO: Nirshinavadite Virgo Celebration continues | VIDEO : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा सुरू

VIDEO : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा सुरू

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १२ - नृसिंहवाडी(शिरोळ) येथे शुक्रवार सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते उत्सव मुरतीवर कृष्णा गंगे  स्नान होऊन  कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याला सुरवात झाली.  

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील,गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार उल्हास पाटील,  जिल्हाधिकारी अमित सैनी आदि मान्यवर उपस्थितीत होते.  कन्या राशीत गुरूने प्रवेश केल्यानंतर दर बारा वर्षांनी हा सोहळा या ठिकाणी सम्पन्न होतो . सकाळी कृष्णा गंगे मध्ये पवित्र स्नान,त्याचबरोबर पुण्याहवाचन आणि गंगा पूजन हे धार्मिक कार्यक्रम पार पडले.देशभरातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी नृसिंहवाडी येथे दाखल झाले आहेत.  पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचातीने विशेष दक्षता घेतली आहे भाविकांना स्नान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नदी घाटावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे मोठया भक्तिमय वातावरणात या स्नानाला आज पासून सुरवात झाली आहे आज पासून 13 महिने हा सोहळा सुरु राहणार आहे.
 
 

Web Title: VIDEO: Nirshinavadite Virgo Celebration continues