VIDEO - नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर विचित्र अपघात, १ ठार
By Admin | Updated: September 11, 2016 13:11 IST2016-09-11T13:03:36+5:302016-09-11T13:11:20+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पिकअप जीप, ट्रक आणि रिक्षा या तीन वाहनांचा अपघात होऊन १ जण जागीच ठार झाला तर अन्य ३ जण जखमी झाले आहेत.

VIDEO - नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर विचित्र अपघात, १ ठार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पिकअप जीप, ट्रक आणि रिक्षा या तीन वाहनांचा अपघात होऊन १ जण जागीच ठार झाला तर अन्य ३ जण जखमी झाले आहेत.
सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. या अपघातात विडीकामगारनगर येथे राहणारा रविंद्र सुरेश बोचरे हा १९ वर्षीय युवक ठार झाला आहे.
तारवालानगर हिरावाडी लिंक रोडने येणाऱ्या पिकअप वरील ( MH 15 EG 0426) चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपने रिक्षा क्रमांक (MH 15 AK 6332) व ट्रक ला ( HR 23 D 1914) ला धडक दिली. या अपघातात अन्य ३ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.