VIDEO : नाशिक - गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
By Admin | Updated: February 10, 2017 15:55 IST2017-02-10T13:59:55+5:302017-02-10T15:55:55+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 10 - सच्च्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून पैसे घेऊन आयात उमेदवारांना तिकीट वाटप केल्याचा आरोप करीत ...

VIDEO : नाशिक - गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 10 - सच्च्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून पैसे घेऊन आयात उमेदवारांना तिकीट वाटप केल्याचा आरोप करीत आज भाजपा पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पालक मंत्री गिरीश महाजन व संगठन मंत्री किशोर काळकर यांची भेट घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली.
या नाराज कार्यकर्त्यांपैकी गणेश कांबळे यांनी तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. परंतु काळकर यांनी मध्यस्थी करून त्यांची व पालकमंत्र्यांची भेट घडवून दिली. पालकमंत्र्यांनी कांबळे यांची मनधरणी केल्यानंतर कांबळे व समर्थकांनी कार्यालय सोडले तर एका नाराज महिलेने तर पालकमंत्रयां समोर आपला हंबरडा फोडीत व्यथा मांडून नाराजी प्रकट केली.
मनपा निवडणुकीचा ध्येयनामा प्रकाशित करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आले असता हा सर्व प्रकार घडला.
https://www.dailymotion.com/video/x844quk