VIDEO : बोचऱ्या थंडीत मुंबई मॅरेथॉनची दिमाखात सुरुवात
By Admin | Updated: January 15, 2017 09:48 IST2017-01-15T09:48:56+5:302017-01-15T09:48:56+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 15 - बोचऱ्या थंडीत आज 14 व्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात झाली. मुख्य मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन ...

VIDEO : बोचऱ्या थंडीत मुंबई मॅरेथॉनची दिमाखात सुरुवात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बोचऱ्या थंडीत आज 14 व्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात झाली. मुख्य मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या शर्यती मॅरेथॉनमध्ये होत आहेत. पहाटे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवत उदघाट केले. यावेळी महादेव जानकर, शायना एनसी उपस्थित होते. यंदाही या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
हाफ मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंच्या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला आहे. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये जी लक्ष्मण यांनी बाजी मारली, तर सचिन पाटील यांनी दुसऱ्या क्रमांक पटकावला. दीपक कुंभार हे तिसरे आले.दिव्यांगांचाही नेहमीप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेत मोठा सहभाग आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. सीएसटीपासून सुरु झालेली दिव्यांगांची मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली. या मॅरेथॉनसाठी 2.4 किलोमीटर इतकं अंतर ठेवण्यात आलं आहे.
https://www.dailymotion.com/video/x844oeh