VIDEO - चेंबूरमध्ये मातंग समाजाचे आंदोलन, वाहतूक ठप्प

By Admin | Updated: August 22, 2016 16:51 IST2016-08-22T15:47:38+5:302016-08-22T16:51:23+5:30

बाबासाहेब गोपले यांच्या निधनाच्या बातमीची प्रसारमाध्यमांनी दखन न घेतल्याने सोमवारी संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले.

VIDEO - The movement of the Matang community in Chembur, the traffic jam | VIDEO - चेंबूरमध्ये मातंग समाजाचे आंदोलन, वाहतूक ठप्प

VIDEO - चेंबूरमध्ये मातंग समाजाचे आंदोलन, वाहतूक ठप्प

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या निधनाच्या बातमीची प्रसारमाध्यमांनी दखन न घेतल्याने सोमवारी संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. 
 
चेंबूर मधील सर्व रस्ते मातंग सामाजच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले आहेत.  पनवेल आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी आणि मुंबईत येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. काही वाहनांची तोडफोडही केली आहे. 
 
मातंग समाजास स्वाभिमानाने जगण्यास शिकवणारे तसेच या सामाजाच्या उन्नतीसाठी शासन व प्रशासकीय स्तरावर झगडणारे अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 
 
प्रसारमाध्यमांनी या वृत्ताची दखन न घेतल्याचे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असले तरी, लोकमतने बाबासाहेब गोपले यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 
 
फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त असणा-या बाबासाहेब गोपले यांच्यावर घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र रविवारी सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Web Title: VIDEO - The movement of the Matang community in Chembur, the traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.