VIDEO - केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रपतींना भेटणार - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 20:02 IST2017-01-05T19:47:12+5:302017-01-05T20:02:45+5:30

 ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5 - केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला घेण्याच्या विरोधात सुरु झालेल्या विरोधकांच्या मोहिमेला समर्थन देत राष्ट्रवादी ...

VIDEO - Meet the President against the Union Budget - Sharad Pawar | VIDEO - केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रपतींना भेटणार - शरद पवार

VIDEO - केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रपतींना भेटणार - शरद पवार

 ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5 - केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला घेण्याच्या विरोधात सुरु झालेल्या विरोधकांच्या मोहिमेला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सर्व विरोधकांना संघटित करून राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी मोदींवर टीका केली. मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेण्याची पद्धत मनमोहन सिंग पंतप्रधान असतांना होती आता तसे होत नाही. आता मंत्र्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची भीती वाटते असे पवार म्हणाले.  पंजाब मध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे,  तर उत्तर प्रदेशात परिवर्तन हवे आहे। सर्व पक्षीय विरोधक एकत्र आले तर भाजपला रोखू शकतील असेही पवार म्हणाले, यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 

https://www.dailymotion.com/video/x844ncm

Web Title: VIDEO - Meet the President against the Union Budget - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.