VIDEO: पुण्यात भव्य मिरवणुकांनी मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना
By Admin | Updated: September 5, 2016 15:03 IST2016-09-05T14:58:05+5:302016-09-05T15:03:46+5:30
वैभवशाली गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून भव्य मिरवणुकांनी पुण्यातील पहिल्या पाच मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली

VIDEO: पुण्यात भव्य मिरवणुकांनी मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना
- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - वैभवशाली गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून भव्य मिरवणुकांनी पुण्यातील पहिल्या पाच मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजल्यापासून शहरात मिरवणुकांना सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणुक नेहमीच्याच पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ आणि केसरी मराठा संस्थेच्या वतीने मिरवणुका काढून वाजत गाजत श्री ची मूर्ती उत्सव मंडपात आणण्यात आली. मिरवणुकीतील ढोलताशा पथकांचे वादन ऐकण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
गुरुजी तालीम -
तांबडी जोगेश्वरी -
कसबा -
केसरी -
तुळशीबाग -