VIDEO - परळच्या राजाचे भव्य आगमन
By Admin | Updated: August 27, 2016 19:30 IST2016-08-27T19:28:07+5:302016-08-27T19:30:15+5:30
'परळच्या राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आज मंडपामध्ये आगमन झाले

VIDEO - परळच्या राजाचे भव्य आगमन
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारी मूर्ती, गणरायाच्या त्या भव्य रुपासमोर आपसूकच जोडले जाणारे हात, 'गणपती बाप्पा मोरया'चा आतून येणारा आवाज आणि ढोला-ताशाच्या तालावर थिरकरणारी पावले हा सारा माहोल आहे 'परळच्या राजा'च्या आगमनाचा.
'परळच्या राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आज मंडपामध्ये आगमन झाले. २० ते २५ फुटाची ही देखणी, सुबक मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकच गर्दी केली होती. यंदा मंडळाचे ६९ वे वर्ष असून, प्रशांत देसाई यांनी गणरायाची ही भव्य मुर्ती साकारली आहे.
गणेशोत्सवाबरोबर सामाजिक कार्याचा वसा संभाळणा-या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा अलिबाग येथे तीनशे झाडे लावली. फक्त झाडे लावून मंडळाने जबाबदारी सोडलेली नाही. यापुढे त्या झाडाच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारीही घेतली आहे. दिवाळीमध्ये दरवर्षी ठाण्यातील विविध आदिवासी पाडयांमध्ये मंडळाच्यावतीने फराळवाटप केले जाते.
छायाचित्र -
सुशील कदम
निर्माण चौधरी
प्रथमेश गार्गे