VIDEO - कोकणात जाणारी लक्झरी बस दरीत कोसळली, २ ठार
By Admin | Updated: September 4, 2016 11:41 IST2016-09-04T06:47:01+5:302016-09-04T11:41:14+5:30
गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना घेऊन कोकणात निघालेल्या खासगी लक्झरी बसला लांजा जवळच्या आंजनारी घाटात अपघात झाला.

VIDEO - कोकणात जाणारी लक्झरी बस दरीत कोसळली, २ ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना घेऊन कोकणात निघालेल्या खासगी लक्झरी बसला लांजा जवळच्या आंजनारी घाटात अपघात झाला. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.
या अपघातात २ जण ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त एमएच ४३ एच ७५५४ बस विशाल ट्रॅव्हल्सची आहे. विशाल ट्रॅव्हल्सची ही बस प्रवाशांना घेऊन देवगडला चालली होती. या अपघातातील जखमींना लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातामुळे आंजनारी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. दरवर्षी कोकण रेल्वे, एसटीकडून अनेक अतिरिक्त गाडया सोडल्या जातात. पण प्रवासी संख्येसमोर या गाडया अपु-या पडत असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहने, लक्झरी बसचा पर्याय स्वीकारतात.
सर्व प्रवासी मुंबईचे
विशाल ट्रॅव्हल्सच्या अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी सध्या मुंबईत राहतात. गणपती उत्सवासाठी ते गावी येत होते. अपघातस्थळाच्या 10 कि.मी. आधी चालक बदलला होता. त्याची झोप उडाली नसल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघात घडल्यानंतर चालक गायब झाला आहे. तो पळून गेला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मृताचे नाव - प्रकाश लब्धे
कृष्णा दत्ताराम कुळये
लांजा अपघतातील जखमींची नावे
प्राजक्ता प्रकाश लब्धे (16) तिचा भाऊ प्रथमेश प्रकाश लब्धे, कुणकेश्वर
चिराग मधुसूदन पालकर (16), कुणकेश्वर
मेधा कृष्णा राणे (72, साळशी देवगड़)
शुभांगी राजेन्द्र राडये (19 तरळे, कणकवली)
दिगम्बर नारायण राणे (70, परेली)
प्रकाश रमेश मळदे (27, कुणकेश्वर)
सुनीता सुनील पवार (40, देवगड़)
संजय मोतीराम वरद (24, शिरगाव देवगड़)
मंगेश मेघशाम साइम (22, कुणकेश्वर)
हरिश्चंद्र जगन्नाथ शेडगे (77, कुणकेश्वर कातवण)
रूपाली रूपेश कदम (25, कुणकेश्वर)
रूपेश मारुती कदम (36, कुणकेश्वर)
संगीता विठ्ठल वाळके (50 कुणकेश्वर)
चिराग पाटकर (16, कुणकेश्वर)
सुश्मिता संतोष नारिंगेकर (34, कुणकेश्वर)
दीपक प्रकाश गुरव (30, नंदगांव)