व्हिडिओ - गर्जा महाराष्ट्र माझा 2016 च्या निमित्ताने मराठीचा जोरदार गजर
By Admin | Updated: June 6, 2016 18:24 IST2016-06-06T18:23:14+5:302016-06-06T18:24:40+5:30
सातासमुद्रापार लंडनमध्ये 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठीचा जोरदार गजर ऐकायला मिळाला

व्हिडिओ - गर्जा महाराष्ट्र माझा 2016 च्या निमित्ताने मराठीचा जोरदार गजर
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 06 - सातासमुद्रापार लंडनमध्ये 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठीचा जोरदार गजर ऐकायला मिळाला.. इंडिगो ग्रीनिच इथं जणू अवघं तारांगण अवतरलं होतं.. यावेळी खास आकर्षण ठरलं ते सेलिब्रिटींचे दमदार परफॉर्मन्स... एकाहून एक सरस आणि बहारदार परफॉर्मन्सनी लंडनमधील रसिकांवर मोहिनी घातली.
भारतीय संस्कृती परदेशातही नांदावी या उद्देशानं लंडनस्थित हरहुन्नरी कलाकार डॉ. महेश पटवर्धन यांनी 2007 पासून 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा कार्यक्रम सुरु केला. काही तरी भव्यदिव्य करण्याच्या इच्छेतून पटवर्धन यांनी सुरु केलेला हा कार्यक्रम यंदा इंडिगो ग्रीनिच इथं रंगला.