VIDEO- विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान

By Admin | Updated: February 3, 2017 20:54 IST2017-02-03T20:54:14+5:302017-02-03T20:54:14+5:30

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 3 - तालुक्यातील भादोला येथील एका शेतातील 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या अस्वलाला वनविभागाच्या चमूने ...

VIDEO - Losing the bear in the well | VIDEO- विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान

VIDEO- विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 3 - तालुक्यातील भादोला येथील एका शेतातील 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या अस्वलाला वनविभागाच्या चमूने शुक्रवारी रात्री रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढले. भादोला परिसरातील मंगेश ठेंग यांच्या शेतातील विहिरीत 1 फेब्रुवारी रोजी अस्वल पडले.

शुक्रवारी सायंकाळी ही माहिती वनविभागाला मिळताच डीएफओ बी. टी. भगत, एसीएफ बी. ए. पोल के मार्गदर्शनात आरएफओ गणेश झोले, संजय राठोड ,सुनील राठोड, पी.एम.बुटे, ईश्वर गवारगुरू, समाधान मांटे, संदीप इंगले, देविदास वाघ, सुधीर कांबळे आणि गवई रात्री 7 वाजता घटनास्थळावर पोहोचले. रात्री अंधारात चार तास रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. अस्वलाला विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. अस्वल पिंजर्यात शिरताच बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोनूने यांनी उपचार केले. नंतर अस्वलाला जंगलात सोडण्यात आले.

https://www.dailymotion.com/video/x844qcc

Web Title: VIDEO - Losing the bear in the well