VIDEO: क्रिकेट खेळणा-या गणपतीचा देखावा
By Admin | Updated: September 10, 2016 21:20 IST2016-09-10T21:16:42+5:302016-09-10T21:20:53+5:30
अकोल्यातील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील सिंधी गणेश उत्सव मंडळांच्या युवकांनी चक्क गणपतीच क्रिकेट खेळताना दाखविला आहे

VIDEO: क्रिकेट खेळणा-या गणपतीचा देखावा
>प्रविण ठाकरे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 10 - गणरायाचे भक्त आपल्या गणपतीला विविध रूपांमध्ये पाहतात व त्याच रूपात तिची प्राणप्रतिष्ठा करतात. अकोल्यातील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील सिंधी गणेश उत्सव मंडळांच्या युवकांनी चक्क गणपतीच क्रिकेट खेळताना दाखविला आहे. झुलेलाल स्टेडीयम मध्ये गणपतीच्या क्रीकेटचा सामना रंगला आहे. तब्बल १६ मुषक गणपतीच्या बॅटींगवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असून हा देखावा संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. सिंधी कॅम्प मधील पक्की खोलीचे हे सिंधी गणेश उत्सव मंडळ दरवर्षी विविध देखावे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शहरातील सर्वाधीक गणेशमंडळे सुद्धा याच परिसरात असून यावर्षीची गणपतीची क्रीकेट टिम अतिशय लक्षवेधी ठरली आहे.