VIDEO - लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट
By Admin | Updated: October 30, 2016 07:14 IST2016-10-30T06:53:15+5:302016-10-30T07:14:56+5:30
दर्जेदार अभिजात संगीताचा स्वरसाज चढवलेल्या लोकमतच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला कृष्णसुंदर गार्डनमध्ये सुरुवात झाली. अमानअली आणि अयानअली खान यांच्या सुरेल सरोद

VIDEO - लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - मस्त गुलाबी थंडी...नवचैतन्याने बहरलेला आसमंत आणि सरोदवादनाचे मंजुळ सूर अशा भारावलेल्या वातावरणात 'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट'च्या स्वरमयी आविष्काराला हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांचे चिरंजीव अमान आणि अयान अली बंगश यांच्या प्रफुल्लित करणाऱ्या सरोदवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील कृष्णसुंदर गार्डन दर्दी रसिकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
सप्तसुरांच्या या मंगलमयी पर्वाने रसिकांची सकाळ अविस्मरणीय केली.