VIDEO- लोकमत ऊर्जा समिट 2017 - ऊर्जेतूनच सर्वांचे भविष्य घडेल
By Admin | Updated: June 10, 2017 12:56 IST2017-06-10T08:37:00+5:302017-06-10T12:56:15+5:30
‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ला सुरुवात झाली आहे.

VIDEO- लोकमत ऊर्जा समिट 2017 - ऊर्जेतूनच सर्वांचे भविष्य घडेल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ला सुरुवात झाली आहे. देशाच्या आर्थिक विकासातील ऊर्जा क्षेत्राचा वाटा आणि भविष्यातील दीर्घकालीन योजना, अशा महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात येईल.
पीयूष गोयल यांच्या उजाला योजनेमुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले, ऊर्जा बचत आणि आर्थिक बचत शक्य झाली, 1 लाख रोजगार निर्माण झाले, ही योजना प्रत्येक घरात पोहोचली तर त्याचा सर्वांना लाभ होईल असे ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितले. आपल्या भाषणात विजय दर्डा यांनी या समिटमागची संकल्पना समजावून सांगितली. पीयूष गोयल यांनी राष्ट्राच्या ऊर्जा धोरणाला दिशा दिली, या क्षेत्रात पीयूष गोयल यांनी पारदर्शकता आणली अशा शब्दात त्यांनी गोयल यांच्या कार्याचे कौतुक केले.
‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मांडलेले मुद्दे
- ऊर्जेतूनच सर्वांचे भविष्य तयार होईल, पीयूष गोयल यांनी राष्ट्राच्या ऊर्जा धोरणाला दिशा दिली, या क्षेत्रात पीयूष गोयल यांनी पारदर्शकता आणली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
- पीयूष गोयल यांनी सुरु केलेला उजाला कार्यक्रम हा भारताच्या ऊर्जा इतिहासातील सर्वात मोठा आणि प्रभावी उपक्रम आहे.
- पीयूष गोयल यांच्या उजाला योजनेमुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले, ऊर्जा बचत आणि आर्थिक बचत शक्य झाली, 1 लाख रोजगार निर्माण झाले, ही योजना प्रत्येक घरात पोहोचली तर त्याचा सर्वांना लाभ होईल.
- वीज वहनाच्या तारा भूमिगत कराव्यात यामुळे अपघात टळतील.
- परवडेल अशा दरात शेतकरी, उद्योगांना वीज मिळावी.
‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’, ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ आणि ‘फायनान्शियल हेल्थ ऑफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयांवर स्वतंत्र परिसंवादही होणार आहे.
आणखी वाचा
पहिल्या सत्रात ‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र पार पडेल. या चर्चासत्रात केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे माजी सचिव अनिल राझदान, एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक दीपक कोकाटे, स्टरलाईट पॉवरचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी वेदमणी तिवारी आदी मान्यवर सहभागी होतील.
दुसऱ्या सत्रात दुपारी १२.०० वाजता ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन, ‘फर्स्ट सोलार’चे देशातील प्रमुख सुजॉय घोष, ‘रवीन ग्रुप ऑफ कंपनी’चे अध्यक्ष विजय करिया आदी मान्यवर मते मांडतील.
तिसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता ‘फायनान्शियल हेल्थ आॅफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयावर टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना, रिलायन्स एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष बॅनर्जी, महावितरणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक या मान्यवरांचा सहभाग असेल.यासह ‘लोकमत ऊर्जा समिट’मध्ये देशासह राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी वीज कंपन्यांचे प्रतिनिधी आणि खासगी वीज कंपन्यांच्या प्रतिनिधीसह कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
Editorial Director, Lokmat Media, @rishidarda delivers his speech to #LokmatUrjaSummit Summit, highlighting India"s energy scenario today. pic.twitter.com/RQYx0eMSnb
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) June 10, 2017