VIDEO- वाहनधारकांची रेल्वेगेट बंद असतांना जीवघेणी कसरत
By Admin | Updated: July 18, 2016 16:35 IST2016-07-18T16:33:36+5:302016-07-18T16:35:56+5:30
रेल्वे गेट बंद असतांना गेट खालून कोणीही जावू नये असे फलक लावले असले, तरीही अनेक वाहनधारक गेटच्या खालून जावून आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे चित्र वाशिम येथे दिसले.

VIDEO- वाहनधारकांची रेल्वेगेट बंद असतांना जीवघेणी कसरत
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ - ‘अती घाई संकटात नेई’ ही म्हण सर्वानांत माहीत आहे, मात्र फार कमी जण त्याचा आर्थबोध घेऊन तशी वागणूक ठेवतात. वाहने सावकाश चालवण्याबाबत परिवहन विभागातर्फे जनजागृती मोठया प्रमाणात केली जाते. रेल्वे गेट बंद असतांना गेट खालून कोणीही जावू नये असे फलक लावले असले, तरीही अनेक वाहनधारक गेटच्या खालून जावून आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे चित्र वाशिम येथे दिसून आले.
वाशिम-पुसद रस्त्याावर असलेल्या रेल्वेगेटजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे. ती मंजुर झाली असून लवकरच तेथे उड्डाणपूल सुध्दा उभारण्यात येईल. परंतु काही नागरिक सद्या असलेल्या रेल्वेगेटच्या खालून आपली वाहन नेत असल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष ठेवून उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.