VIDEO - पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकलीची जीवघेणी कसरत
By Admin | Updated: September 21, 2016 17:43 IST2016-09-21T13:38:01+5:302016-09-21T17:43:09+5:30
आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी एखाद्या चिमुकलीला जिवघेणी कसरत करावी लागत असल्याचे मालेगाव येथे दिसून येत आहे

VIDEO - पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकलीची जीवघेणी कसरत
यशवंत हिवराळे, ऑनलाइन लोकमत
राजुरा, दि. २१ - पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वच धावपळ करतांना दिसून येतात. परंतु आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी एखाद्या चिमुकलीला जिवघेणी कसरत करावी लागत असल्याचे मालेगाव येथे आठवडीबाजार व इतर दिवशी दिसून येत आहे.
‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है’ सदर गित वाजवून दोरीवरुन चालण्याची कसरत एक चिमुकली करुन ते झाल्यानंतर सर्वांसमोर पैशाची मागणी करीत आहे. एका कार्यक्रमामधून १०० ते २०० रुपये जमा झाल्यानंतर या चिमुकलीसोबत असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मोठया व्यक्तिने दोरीवर चालून दाखविले तर यामध्ये काही नाविण्य नाही. त्याला लोकपसंती सुध्दा मिळत नाही परंतु एखादी लहान मुलगी जीचे वय खेळण्या बागळण्याचे आहे ते जर असे थरारक, जिवघेणी कसरत करीत असेल तर कोणालाही कौतूक वाटेल.
म्हणून चिमुकलीला दोरीवर चालून कसरती कराव्या लागत आहे. ज्या मुलींच्या आई-वडिलाने तीचा लाड पुरवावा आज तीच त्या चिमुकलीवर विसंबुन आहेत. मालेगाव येथील आठवडी बाजार २० सप्टेंबर रोजी विविध भागात या मुलीेचे चित्तथरारक कसरती झाल्यात आज २१ सप्टेंबर रोजीही शहरात विविध भागत ती कसरती करतांना आढळून आली.