VIDEO - पाण्याच्या शोधात बिबट्या अडकला शौचालयात
By Admin | Updated: April 28, 2017 10:52 IST2017-04-28T10:52:10+5:302017-04-28T10:52:10+5:30
ऑनलाइन लोकमत दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या ...

VIDEO - पाण्याच्या शोधात बिबट्या अडकला शौचालयात
ऑनलाइन लोकमत
दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या घुसला. पाण्याचे शोधात बिबट्या शौचालयात घुसल्यावर तेथील कामगाराने शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने बिबट्या तेथेच अडकून पडला. सदर घटना वनविभागास कळविण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी त्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
खेडगाव येथे किरण शेटे यांचे द्राक्ष भाजीपाला निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेज असून तेथे सकाळी सातच्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश केला यामुळे तेथील कामगारांची घाबरगुंडी उडाली ते लपून बसले मात्र बिबट्या पाण्याच्या शोधात शौचालयात गेला असता एका कामगाराने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद करत बिबट्याला कोंडून ठेवत वनाधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रवाना झाले आहे.