VIDEO- वाशिमात बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात

By Admin | Updated: December 30, 2016 16:36 IST2016-12-30T16:36:31+5:302016-12-30T16:36:31+5:30

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 30 - एकच पर्व-बहुजन सर्व असा नारा देत बहुजन क्रांती मोर्चाला वाशिम येथे दुपारी २.३० ...

VIDEO: Launch of the Bahujan Kranti Morcha in Washim | VIDEO- वाशिमात बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात

VIDEO- वाशिमात बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 30 - एकच पर्व-बहुजन सर्व असा नारा देत बहुजन क्रांती मोर्चाला वाशिम येथे दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.
स्थानिक जुने जिल्हा परिषद मैदान येथे ग्रामीण भागातून आलेले मार्चेकरी एकत्र आले. येथे जाहीर सभा झाल्यानंतर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली.

हातात हिरवे, पिवळे, निळे, पांढरे, भगवे अशा विविध रंगाचे ध्वज व विविध घोषवाक्य असलेले फलक घेऊन मोर्चेकरी पाटणी चौक मार्गे शिवाजी चौकात आले. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून मोर्चेकरी पाटणी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे मार्गस्थ झाले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर मोर्चा शहर पोलीस स्टेशन, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.

या मोर्चात जिल्हाभरातील ७८ सामाजिक संघटनांचा सहभाग आहे. ५०० युवक व १०० युवती असे ६०० स्वयंसेवक बहुजन क्रांती मोर्चा असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करून मोर्चाची शिस्त सांभाळत आहेत.

https://www.dailymotion.com/video/x844mw5

Web Title: VIDEO: Launch of the Bahujan Kranti Morcha in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.