VIDEO- 'लोकमत'च्या प्रोत्साहनामुळेच अंतिम फेरीत- ललिता बाबर

By Admin | Updated: September 6, 2016 21:08 IST2016-09-06T21:08:39+5:302016-09-06T21:08:39+5:30

लोकमतने दिलेल्या महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर या पुरस्कारामुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळालीे.

VIDEO - Lalita Babar in the final round of 'Lokmat' promotion | VIDEO- 'लोकमत'च्या प्रोत्साहनामुळेच अंतिम फेरीत- ललिता बाबर

VIDEO- 'लोकमत'च्या प्रोत्साहनामुळेच अंतिम फेरीत- ललिता बाबर

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. 6 - लोकमतने दिलेल्या महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर या पुरस्कारामुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळालीे. लोकमतच्या प्रोत्साहनामुळेच मी रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले, हे कधीही विसरू शकत नाही. लोकमतने असेच प्रोत्साहन द्यावे, अशा भावना अर्जुन पुरस्कार विजेती ललिता बाबर हिने व्यक्त केल्या.

रिओ आॅलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपल चेस क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर मूळ गावी मोही येथे आली, तेव्हा ती लोकमतशी बोलत होती. ललिता म्हणाली, महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी सरावामुळे मुंबईत उपस्थित राहू शकणार नव्हते, तरीही लोकमतने मला अ‍ॅवॉर्ड जाहीर केला. माझ्या अनुपस्थितीत हा अ‍ॅवॉर्ड माझ्या पालकांना दिला.

लोकमतने मला मोठी साथ दिलेली आहे. हे मी माझे भाग्य समजते. यावेळी ललिताचे वडील शिवाजी बाबर, आई निर्मला, काका गणेश, मनोहर, चुलती सुवर्णा बाबर, मोनिका बाबर, आजोबा निवृत्ती बाबर, आजी सखूबाई बाबर उपस्थित होते.
 

Web Title: VIDEO - Lalita Babar in the final round of 'Lokmat' promotion