VIDEO : अंबाबाईच्या उपाशी भक्तांसाठी कोल्हापूरकर आले धावून

By Admin | Updated: November 10, 2016 13:25 IST2016-11-10T12:55:27+5:302016-11-10T13:25:47+5:30

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 - केंद्र सरकारकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याने पर्यटनासाठी बाहेर ...

VIDEO: Kolhapurkar came to Ambabai's hungry devotees | VIDEO : अंबाबाईच्या उपाशी भक्तांसाठी कोल्हापूरकर आले धावून

VIDEO : अंबाबाईच्या उपाशी भक्तांसाठी कोल्हापूरकर आले धावून

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 10 - केंद्र सरकारकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याने पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडे सुट्टे पैसे नसल्याने साधा चहा, नाश्ता करणेदेखील कठीण झाले होते.
 
भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज सकाळी भवानी मंडप येथे अंबाबाईच्या भाविकांसाठी मोफत नाश्त्याचे वाटप करण्यात आले. युवासेना कोल्हापूर जिल्हा आणि क्षत्रिय मराठा रियासात फाऊंडेशनच्या वतीने भाविकांना मोफत नाश्ता वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
यावेळी युवासेना कोल्हापूर जिल्हा आणि  क्षत्रिय मराठा रियासात फाऊंडेशनचे कार्यकर्ते भाविकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात हजर होते. गैरसोय टळल्याने भाविकांनीदेखील यावेळी त्यांचे आभार मानले. 
 

https://www.dailymotion.com/video/x844hg5

Web Title: VIDEO: Kolhapurkar came to Ambabai's hungry devotees