VIDEO : मुकी जनावरेही जाणतात ‘त्यांची’ भाषा!
By Admin | Updated: September 28, 2016 16:20 IST2016-09-28T16:17:15+5:302016-09-28T16:20:24+5:30
माणसाच्या सहवासात लहानाची मोठी होणारी अथवा सतत त्यांच्या अवतीभोवती वावरणारी जनावरे कालांतराने आपसूकच माणसाळतात

VIDEO : मुकी जनावरेही जाणतात ‘त्यांची’ भाषा!
- सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २८ - माणसाच्या सहवासात लहानाची मोठी होणारी अथवा सतत त्यांच्या अवतीभोवती वावरणारी जनावरे कालांतराने आपसूकच माणसाळतात, याची प्रचिती वाशिममधील पशूपालक दिलीप सोनी यांच्याकडे असलेल्या जनावरांकडे पाहिल्यानंतर येते. ही मुकी जनावरे सोनी यांची भाषा जाणून त्यांचा आवाज अन् इशाºयावर हवी ती कृती करित असल्याचे पाहावयास मिळते.
मारवाडी समाजातील दिलीप सोनी यांच्या कुटूंबात गुंठाभरही शेती नाही. असे असताना त्यांनी गेल्या २८ वर्षांपासून पशूपालनाच्या माध्यमातून वाशिममध्ये दुग्धक्रांती घडवून आणली. याकामी त्यांना त्यांच्या पत्नी माधुरी सोनी यांची मोलाची साथ लाभली. विना भोसळ दुध आणि ते तयार करित असलेल्या दुधाच्या विविध पदार्थांना वाशिममध्ये सर्वाधिक मागणी आहे. घरी शेती नसतानाही त्यांच्याकडे आजरोजी ३५ म्हशी आणि १४ गायी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अमेरिकन प्रजातीचा ‘रेडा’ असून ही सर्व जनावरे त्यांचा आवाज ओळखतात. एरव्ही, ‘रेडा’ अथवा ‘हाल्या’ ही जनावरे मानसासाठी घातक मानली जातात. मात्र, सोनी यांचा भलामोठा ‘रेडा’ त्यांच्या इशाºयावर मागचे दोन्ही पाय उचलून आदराने त्यांना अभिवादन करतो. हे चित्र पाहिल्यानंतर जनावरांमध्येही कुठेतरी माणूसपण दडल्याची अनुभूती निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही.