VIDEO- जळगावात गणपतीच्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना
By Admin | Updated: September 8, 2016 22:42 IST2016-09-08T22:21:00+5:302016-09-08T22:42:08+5:30
तृतीय पंथीयांना गुरुवारी संध्याकाळी तहसील कार्यालयाजवळील लाकडी गणपतीच्या आरतीचा मान गुरुवारी संध्याकाळी देण्यात आला.

VIDEO- जळगावात गणपतीच्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8 - प्राचीन काळापासून दुर्लक्षित व वंचित घटक असलेल्या तृतीय पंथीयांना गुरुवारी संध्याकाळी तहसील कार्यालयाजवळील लाकडी गणपतीच्या आरतीचा मान देण्यात आला.
गुरुवारी संध्याकाळी पायल जान, करिश्मा जान, मेहंदी जान, संजना जान, गायत्री जान, खुशी जान, रेश्मा जान, रविना जान, गोपी जान, नुरी जान, तनु जान, नंदिनी जान, निर्मला जान यांच्या हस्ते गणरायाची आरती करून विधीवत पूजा करण्यात आली.
त्यानंतर सेवेकऱ्यांतर्फे आरतीसाठी आलेल्या तृतीयपंथीयांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला. समाजातील वंचित घटकांना आरतीचा सन्मान दिल्याबद्दल पायल जानसह अन्य तृतीयपंथीयांनी लाकडाचा गणपती सेवेकऱ्यांचे आभार मानले.