VIDEO- गावाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जैन संस्थानचा असाही उपक्रम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 17:51 IST2017-02-06T17:28:19+5:302017-02-06T17:51:46+5:30
ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे वाशिम, दि. 6 - देवालय अथवा मंदिर परिसरातील शिल्पकलेसाठी तसेच येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर ...

VIDEO- गावाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जैन संस्थानचा असाही उपक्रम !
ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 6 - देवालय अथवा मंदिर परिसरातील शिल्पकलेसाठी तसेच येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने ६०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांना लागणारे अन्नधान्य गावातूनच खरेदी करून दिले जात असल्याने संस्थानने बेरोजगारांसोबत गावाचाही विकास साधला आहे.
संस्थानच्या पारसबाग परिसरात विविध विकासकामांसह भव्यदिव्य जलमंदिर बांधण्याचा निर्णय चंद्रशेखर सूरिश्वरजी महाराज यांनी घेतला. त्यासाठी १०० फूट खोल विहीर खोदण्यात आली. या मंदिराच्या शिल्पकलेसाठी राजस्थानमधील ग्रेनाइट व मार्बलपेक्षा मालेगाव व रिसोड तालुक्यांतील शेतात आढळणारे महाकाय दगड वापरले जात आहेत. येथे काम करण्यासाठी असलेल्या बेरोजगारांमुळे शिरपूर येथील व्यावसायिकांचा सुद्धा चांगला फायदा होत आहे.
६०० मजुरांना लागणारे अन्नधान्यसुद्धा शिरपूर येथूनच खरेदी करून त्यांना देण्यात येत असल्याने जैन संस्थाने बेरोजगारांसोबत गावाचाही विकास साधला आहे.