VIDEO : स्वदेशी खांदेरी पाणबुडीचे झाले जलावतरण
By Admin | Updated: January 12, 2017 13:16 IST2017-01-12T08:59:11+5:302017-01-12T13:16:40+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १२ - कलवरी श्रेणीतील स्वदेशी खांदेरी पाणबुडीचे आज जलावतरण करण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ...
VIDEO : स्वदेशी खांदेरी पाणबुडीचे झाले जलावतरण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - कलवरी श्रेणीतील स्वदेशी खांदेरी पाणबुडीचे आज जलावतरण करण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत जलावतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी एमडीआयएल आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
MDIL आणि DCNS या फ्रेंच कंपनीच्या सहभागातून या पाणबुडीची बांधणी माझगाव गोदीत करण्यात आली. या वर्षात म्हणजेच डिसेंबर २०१७ पर्यंत पाणबुडीच्या विविध चाचण्या केल्या जातील. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने सागरीसिद्धता तपासली जाईल. सध्या अशाप्रकारच्या एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती गोदीत सुरू आहे.
( फोटो : दत्ता खेडेकर)
https://www.dailymotion.com/video/x844nwy