VIDEO - तब्बल ४१ वर्षांपासून बाप्पांचे सारथ्य करतायत इब्राहिम
By Admin | Updated: September 5, 2016 20:55 IST2016-09-05T20:55:48+5:302016-09-05T20:55:48+5:30
हिंदू बांधवांना बाप्पा मोरयाच्या उत्सवाची जितकी ओढ असते, तितकीच आतुरता इतर धर्मियानांही या उत्सवाची असते.

VIDEO - तब्बल ४१ वर्षांपासून बाप्पांचे सारथ्य करतायत इब्राहिम
अनिल गवई, ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. ५ - हिंदू बांधवांना बाप्पा मोरयाच्या उत्सवाची जितकी ओढ असते, तितकीच आतुरता इतर धर्मियानांही या उत्सवाची असते. त्यामुळेच या उत्सवाला सर्वधर्म समभावाचा उत्सव म्हणूनही संबोधल्या जाते. सर्व धर्मियांचा या उत्सवाला हातभार लागत असतो, मात्र, तब्बल ४१ वर्षांपासून खामगाव येथील शे. इब्राहिम बाप्पांचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभत आहे.
खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागातील ६६ वर्षीय शे. इब्राहिम गेल्या ४४ वर्षांपासून हातरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर त्यांच्या परिवाराचा उदर निर्वाह चालतो. हिंदूच्या विविध सणासुदीच्या मंडप तसेच इतर साहित्य त्यांच्या मालवाहू रिक्षातून वाहून नेल्या जाते.
त्याचवेळी गणेशोत्सवाच्या काळात शे. इब्राहिम विविध गणेश मंडळाच्या बाप्पांचे सारथ्य करतात. गेल्या ३६ वर्षांपासून नित्य नियमाने गणेशोत्सव काळात ते बाप्पा मोरयाच्या मूर्ती घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी पोहोचवितात. महाभारतात अर्जुनाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णाने केले होते. त्याप्रमाणेच आपण बाप्पांचे सारथ्य करण्याचे भाग्य आपणाला लाभत असल्याचे शे. इब्राहिम यांचे म्हणणे आहे. शे. इब्राहिम यांच्याप्रमाणेच अनेक इतर धर्मिय बांधवांना गणेशोत्सव काळात रोजगार मिळत असल्याने, या उत्सवांची अनेकांना आतुरता लागून असते.