VIDEO: महाबळेश्वरच्या चक्रीवादळानं पर्यटकांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 17:59 IST2017-02-25T17:57:08+5:302017-02-25T17:59:13+5:30
ऑनलाइन लोकमत महाबळेश्वर (सातारा), दि. 25 - पर्यटकांच्या मनपसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरात शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या चक्रीवादळाने सर्वांचीच ...

VIDEO: महाबळेश्वरच्या चक्रीवादळानं पर्यटकांची धांदल
ऑनलाइन लोकमत
महाबळेश्वर (सातारा), दि. 25 - पर्यटकांच्या मनपसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरात शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या चक्रीवादळाने सर्वांचीच दाणादाण उडाली. चक्रीवादळामुळे व्यापा-यांच्या छत्र्याच उडून गेल्या.
वीक एण्ड असल्याने वेण्णालेक येथे पर्यटकांची गर्दी झाली होती. अशावेळी दुपारी वाऱ्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर 'वेण्णा लेक'च्या वाहनतळाजवळ अकस्मात चक्रीवादळ निर्माण झाले. मैदानातले हे चक्रीवादळ सुमारे पाच मिनिटे घुमत होते. या दरम्यान रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या-मोठया स्ट्रॉल विक्रेत्यांच्या छत्र्या उडून गेल्या. अनेकांची तारांबळ उडाली.
हे चक्रीवादळ पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व महाबळेश्वर बाजार पेठेकडे निघालेले पर्यटक थांबले. या चक्रीवादळाचे मोबाईलमधून शूटिंग काढण्यासाठीही जणू स्पर्धा लागली होती.
https://www.dailymotion.com/video/x844t74