VIDEO : महाबळेश्वरमधल्या पावसामुळे महाडमधला पूल कोसळला

By Admin | Updated: August 3, 2016 16:09 IST2016-08-03T10:52:51+5:302016-08-03T16:09:31+5:30

महाबळेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढून सावित्री नदीला पूर आला.

VIDEO: The heavy bridge collapsed due to the rain in Mahabaleshwar | VIDEO : महाबळेश्वरमधल्या पावसामुळे महाडमधला पूल कोसळला

VIDEO : महाबळेश्वरमधल्या पावसामुळे महाडमधला पूल कोसळला

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - महाबळेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढून सावित्री नदीला पूर आला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दाब येऊन जूना पूल कोसळल्याची असल्याची प्राथमिक शक्यता आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल बोलताना सांगितले. 
 
महाड आणि पोलादपूरला जोडणा-या सावित्री नदीवर दोन समांतर पूल होते. त्यातील ब्रिटीश कालीन जूना पूल कोसळून दोन एसटीबसेससह काही छोटी वाहने वाहून गेली. नव्या आणि जुन्या दोन्ही पूलांवरुन वाहतूक सुरु होती. 
 
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच रायगडच्या जिल्हाधिका-यांशी संपर्क साधला. प्रशासनाकडून तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता वाहनांचा शोध घेतला जात आहे. 
 
 
 


 

Web Title: VIDEO: The heavy bridge collapsed due to the rain in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.