VIDEO - 'त्यांनी' स्मशानात साजरी केली दिवाळी
By Admin | Updated: October 29, 2016 21:14 IST2016-10-29T21:13:01+5:302016-10-29T21:14:17+5:30
आपली दिवाळी आज स्मशानात साजरी केली. अमावस्या व स्मशान या बाबत अनेक गूढ गोष्टी सांगण्यात येतात.

VIDEO - 'त्यांनी' स्मशानात साजरी केली दिवाळी
ऑनलाइन लोकमत
मनमाड, दि. २९ - येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळी आज स्मशानात साजरी केली. अमावस्या व स्मशान या बाबत अनेक गूढ गोष्टी सांगण्यात येत असल्या तरी ही अंधश्रद्धा दूर करून स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा या साठी ही संकल्पना राबवण्यात आली असल्याचे पोलस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्मशानात स्वच्छता करून हजारो पणत्या प्रज्वलित केल्याने स्मशानात दिव्यांचा लखलखाट पसरला होता.