शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Video: गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून करावा लागतोय प्रवास; 'पर्यावरण दिनी' धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 10:23 IST

World Environment Day: विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.

शरदचंद्र खैरनार

नाशिक-  गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले असताना प्रत्यक्षात मात्र गोदावरीनदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे शहरालगत असलेल्या ओढा येथे गोदावरी नदीत प्रदूषणामुळे प्रचंड फेस आला असून अशा स्थितीत दुचाकीस्वारांना आणि वाहनचालकांना मार्ग काढीत यावे लागत आहे आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे. गोदावरी नदी ही सहा राज्यातून जाणारी जीवनदायिनी आहे मात्र नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी अपेक्षित प्रयत्न केले जात नाही त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे उगमस्थान असलेल्या ठिकाणापासून नदीचे प्रदूषण सुरू होते त्या संदर्भात नाशिक मधील काही पर्यावरणप्रेमींनी 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या आधारे विविध प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. 2018 मध्ये या याचिकेवर निकाल लागला मात्र त्यानंतरही नाशिक शहरात तपोवन टाकळी आणि ओढा या परिसरात मोठ्या प्रमाणात फेसाळ नदी वाहत आहे.

नाशिक शहराजवळील नाशिक तालुक्यातील एकलहरे येथील बंधाऱ्यातून रासायनिक पाणी नदीपात्रात जात असून काल पाऊस झाल्याने बंधाऱ्यातील पानवेली आणि रसायन ओढा नाल्याकडे वाहून आले आहेत त्यामुळे पाणी फेसाळ झाले आहेत त्यातच नाल्यातील फारशी काढण्यात आली असून अशा वेळी नागरिकांना फेसाळ नदीतून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आज दिसत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदीenvironmentपर्यावरण