VIDEO : तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: October 4, 2016 12:17 IST2016-10-04T09:33:31+5:302016-10-04T12:17:04+5:30

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे ऐन कामावर जाण्याच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

VIDEO: Harbor rail disrupted due to technical difficulties | VIDEO : तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

VIDEO : तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऑनलाइन  लोकमत

मुंबई, दि. ४ - तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  ऐन कामावर जाण्याच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कुर्ल्याहून पनवेलकडे जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसंच टिळकनगर- कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान लोकल खोळंबल्या आहेत.लोकल खोळंबल्यामुळे प्लॅटफॉर्म प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे, रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हार्बर रेल्वेवरील खोळंब्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. 
 

Web Title: VIDEO: Harbor rail disrupted due to technical difficulties