VIDEO - हगणदारीमुक्तीसाठी लोककलावंतांसह गुड मॉर्निंग पथकाचे नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 18:07 IST2017-01-08T17:36:10+5:302017-01-08T18:07:40+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 8 - गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी लोककलावतांसह गुड मॉर्निंग पथकाने आता पहाटेच्या सुमारास शौचालय नसलेल्यांच्या घरासमोर ...

VIDEO - हगणदारीमुक्तीसाठी लोककलावंतांसह गुड मॉर्निंग पथकाचे नृत्य
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी लोककलावतांसह गुड मॉर्निंग पथकाने आता पहाटेच्या सुमारास शौचालय नसलेल्यांच्या घरासमोर नृत्य करून जनजागृतीच्या मोहिमेत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसून येते. उघड्यावरील शौचवारीला पायबंद घालणे, सामाजिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, गाव स्वच्छ व सुंदर बनविणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे या मुख्य उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जनजागृतीपर विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथकाद्वारे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून समज व कारवाई केली जात आहे. आता पहाटेच्या सुमारास लोककलावंतांसह गावोगावी जाऊन गुड मॉर्निंग पथक, जिल्हा परिषदेचे कर्मचारी सैराटच्या चालीवर शौचालय बांध..बांध..बांध.. या गाण्यावर नृत्य करून उघड्यावरील शौचवारीस पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही लोककलावंत व गुड मॉर्निंग पथक, कर्मचाऱ्यांनी मंगरूळपीर तालुक्यातील दाभडीसह परिसरात नृत्य करून स्वच्छतेचा जागर केला.
https://www.dailymotion.com/video/x844nl0