VIDEO : एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात निवडणूक आयोगाकडे जाणार
By Admin | Updated: January 23, 2017 19:29 IST2017-01-23T19:26:31+5:302017-01-23T19:29:31+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 23 मनपा निवडणुकीत आपल्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपाने गुंडांना पक्षात प्रवेश दिला असल्याची टीका आमदार ...

VIDEO : एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात निवडणूक आयोगाकडे जाणार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23 मनपा निवडणुकीत आपल्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपाने गुंडांना पक्षात प्रवेश दिला असल्याची टीका आमदार अजय चौधरी यांनी आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच शिवसैनिकांवर होत असलेल्या एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"नाशिकमध्ये शिवसैनिकांना जाणून बुजून हेतुपुरस्कर टार्गेट केले जात असून, एकीकडे सरकारने २०१५ पर्यंतच्या राजकीय केसेस काढून टाकण्याचा अध्यादेश काढला असून, दुसरीकडे नाशिकमधील काही शिवसैनिकांना नोटीसा बजावल्या जात आहेत,ही बाब चुकीची असून सरकारने सर्वांना समान न्याय द्यावा.सेनेप्रमाणेच भाजपामधील कार्यकर्त्यांवर देखील केसेस आहेत मग त्यांनाही नोटिसा बजावून त्यांचेवर कारवाई करावी. फक्त शिवसैनिकांनाच टार्गेट केले जात असल्याने याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. वेळप्रसंगी नाशिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेण्यात येईल,"असे अजय चौधरी यांनी सांगितले.
https://www.dailymotion.com/video/x844pb9