VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! विक्रोळी स्टेशनवरील धक्कादायक घटना
By Admin | Updated: February 1, 2017 22:41 IST2017-02-01T22:41:22+5:302017-02-01T22:41:22+5:30
एका व्यक्तिने आत्महत्या करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत असलेल्या लोकलसमोर दोन रूळांमध्ये उडी घेतली

VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! विक्रोळी स्टेशनवरील धक्कादायक घटना
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबई उपनगरिय रेल्वे हे आत्महत्येचे ठिकाण बनत चालले आहे. मात्र, नशीब बलवत्तर असेल तर...अशीच एक घटना मंगळवारी वीक्रोळी स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिनकर सकपाळ (65) नावाच्या व्यक्तिने आत्महत्या करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत असलेल्या लोकलसमोर दोन रूळांमध्ये उडी घेतली. त्यांच्या अंगावरून लोकल गेली, मात्र आश्चर्यकारकरित्या ते यातून वाचले आणि त्यांना साधं खरचटलंही नाही.
घटनेनंतर विक्रोळी स्थानकावरील आरपीएफने सकपाळ यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.