VIDEO- कुत्र्याच्या पिलावरून तरुणीला मारहाण

By Admin | Updated: September 27, 2016 18:16 IST2016-09-27T18:16:13+5:302016-09-27T18:16:13+5:30

कुत्र्यांची दोन महिन्यांची पिले नेऊ देण्यास विरोध करणाऱ्या तरुणीसह तिच्या आईला एकाने बेदम मारहाण केली.

VIDEO: The girl is beaten by the puppy | VIDEO- कुत्र्याच्या पिलावरून तरुणीला मारहाण

VIDEO- कुत्र्याच्या पिलावरून तरुणीला मारहाण

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 27 - कुत्र्यांची दोन महिन्यांची पिले नेऊ देण्यास विरोध करणाऱ्या तरुणीसह तिच्या आईला एकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणीचा दात पडला असून, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी मिलिंद काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती अ‍ॅनिमल वेलफेअर संस्थेत काम करते. आकाशदर्शन सोसायटीमध्ये राहण्यास असलेल्या या तरुणीचे प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. काळे यांनी महापालिकेच्या श्वान पथकाची गाडी बोलावून सोसायटीमधील कुत्र्यांची पिले घेऊन जाण्यास सांगितले होते.

या तरुणीने ही पिले लहान आहेत, त्यांना नेऊ नका असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या काळे याने तरुणी आणि आईला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी व तिची आई गंभीर जखमी झाली आहे.

Web Title: VIDEO: The girl is beaten by the puppy