Video: गंगापूर धरणसाठा 39 टक्के ; काश्यपीमधून पाणी उचलण्यास सुरूवात

By Admin | Updated: May 7, 2017 16:10 IST2017-05-07T15:00:27+5:302017-05-07T16:10:32+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 7 -  पावसाळा जवळ आल्याने गंगापूर धरण समुहामधील धोंडेगावजवळील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणात घेण्यास ...

Video: Gangapur Dam is 39%; Kashyapi starts water harvesting | Video: गंगापूर धरणसाठा 39 टक्के ; काश्यपीमधून पाणी उचलण्यास सुरूवात

Video: गंगापूर धरणसाठा 39 टक्के ; काश्यपीमधून पाणी उचलण्यास सुरूवात

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 7 -  पावसाळा जवळ आल्याने गंगापूर धरण समुहामधील धोंडेगावजवळील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणात घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. काश्यपीमध्ये एकूण १ हजार ७३३ दलघफू इतका पाणीसाठा होता. धरण ९३ टक्के भरलेले होते. दोन दिवसांपासून गंगापूर धरणामध्ये काश्यपीमधून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप १ हजार ४०३ दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये घेण्यात आले आहे. धरणाची पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाली असून सुमारे ३९ टक्के धरणामध्ये पाणीसाठा झाला आहे. काश्यपीमधून सुमारे ७५ टक्के इतका पाणीसाठा गंगापूरमध्ये सोडला जाणार आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकºयांची गैरसोय होणार नाही.
 

https://www.dailymotion.com/video/x844yp4

Web Title: Video: Gangapur Dam is 39%; Kashyapi starts water harvesting