VIDEO-अकोल्यात साकारतेय 11 लाखांच्या नोटांची गणेशमूर्ती !

By Admin | Updated: September 5, 2016 06:36 IST2016-09-05T06:36:37+5:302016-09-05T06:36:37+5:30

करकरीत नोटांपासून अकोल्यात अभिनव श्रीमूर्ती साकारली जात असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते.

VIDEO - Ganesh idol of 11 lakhs notes in Akola! | VIDEO-अकोल्यात साकारतेय 11 लाखांच्या नोटांची गणेशमूर्ती !

VIDEO-अकोल्यात साकारतेय 11 लाखांच्या नोटांची गणेशमूर्ती !

संजय खांडेकर / ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 5 - अकरा लाख रुपयांच्या करकरीत नोटांपासून अकोल्यात अभिनव श्रीमूर्ती साकारली जात असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. गवळीपुरा मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमात शहारातील अनेक उद्योजकांनी आर्थिक हातभार लावला आहे. दिव्यांग राजेश ऊर्फ टिल्लू टावरी या कलावंत युवकाच्या कल्पनेतून ही नोटांची मूर्ती साकारत आहे. दहा रुपयांपासून तर एक हजार रुपयाच्या नोटेचा यामध्ये उपयोग समावेश असून मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी स्ट्राँग रूम आणि आठ सीसी कॅमेरे नजर ठेवणार आहेत.
मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ गत ४८ वर्षांपासून श्रीमूर्तीची स्थापना करीत आहे. त्यातही गेल्या ३८ वर्षांपासून इको फ्रेंडली मूर्ती स्थापन करण्याचा आदर्श या मंडळाने निर्माण केला आहे. यावर्षी साकारत असलेली नोटांची मूर्ती लोखंडी चौकटीवर बनविली जात आहे. मूर्ती विसर्जनाच्या वेळी केवळ प्रतिष्ठापनेची मानाची लहान मूर्ती शिरवली जाते. यंदा या मंडळाने विविधरंगी नोटांच्या छटांतून आकर्षक रेखीव प्रतिमा साकारण्याचा प्रयोग केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत अकरा लाख रुपयांच्या नोटांच्या मूर्तीचे काम सुरुच होते. सोमवारी सायंकाळी प्रतिष्ठापनेच्या वेळेपर्यंत मूर्ती पूर्णरूपास येणार असल्याची माहिती राजेश टावरी यांनी दिली. या उपक्रमास राजेश शर्मा, विजय चौरसिया, अमुल देशपांडे, शेख इमाम हसन, डॉ. सरोज माहेश्वरी, भरत पवार, कल्पेश सावय्या यांचे सहकार्य लाभले आहे.

सामाजिक एकोप्याचे प्रतीक
सामाजिक एकतेच्या उद्देशाने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात वीर भगतसिंग मंडळ शंभर टक्के कार्य करीत आहे. या मंडळात दोन मुस्लीम सदस्यदेखील सहभागी असतात. गेल्या दहा वर्षांपासून गवळीपुऱ्यातील शेख इमाम शेख हसन आणि बुडन गाडेकर या मुस्लीम युवकांचा समावेश आहे.

मुद्रांच्या इतिहासाचे राहील आकर्षण
मुद्रा केव्हा कधी अस्तित्वात आल्यात, कोणत्या काळात कोणते चलन कोणत्या राजाने आणले, याची सविस्तर माहिती या मंडळाच्यावतीने गणेशभक्तांसाठी दिली जाणार आहे. मुद्रांचा अवमान होऊ नये, याची संपूर्ण काळजी घेतली असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: VIDEO - Ganesh idol of 11 lakhs notes in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.