VIDEO : गणेश उत्सव तलावांसाठी ठरतोय कर्दनकाळ, निर्माल्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: September 8, 2016 12:21 IST2016-09-08T11:34:35+5:302016-09-08T12:21:06+5:30
तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे.

VIDEO : गणेश उत्सव तलावांसाठी ठरतोय कर्दनकाळ, निर्माल्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात
नीलेश शहाकार, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ८ - तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे. परंतु याही तलावांच्या वैभवाला आता प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये देवपुजेचे निर्माल्य नागरिकांकडून बेधडकपणे शहरातील तलावांमध्ये फेकले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होवून पर्यावरणास धोका निर्माण होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील तार तलाव, लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झाले आहेत. त्यातच इंग्रजकाळात शहराला पाणी पुरवठा करणाया संगम तलावाला निर्माल्य, घरकुती कचरा व पाणपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे.त्यामुळे तलावाच्या काठशेजारी कचºयाचे ढिगारे साचलले दिसतात. त्यामुळे लवकर या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात बुलडाणा- औरंगाबाद मार्गावरील संगम तलाव नामशेष होण्याची शक्यता निर्माण होवून शकते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता.त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वर्षे शहराला संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव केव्हाचेच नामशेष झाले आहेत. तर आता इंग्रजकालीन पाणी पुरवठा करणा-या संगम तलावाचे व सरकारी तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत आता नागरिकांनी जागृक होण्याची गरज आहे. परिसर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे संगम तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आता विशेष लक्ष देत, प्रशासनाकडून येथे नागरिकांच्या सोईसाठी येथे ‘वॉकिंग ट्रैक’ तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र प्रशासनाचे तलावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. तलाव प्रदूषित होण्याला सर्वात मोठे कारण गणेश उत्सवात मूर्ती विसर्जन, निर्माल्य, कचरा तलावात फेकण्याचे आहे.