व्हिडीओ - अहमदनगर जिल्ह्यात मूळा नदीला पूर

By Admin | Updated: July 10, 2016 16:33 IST2016-07-10T11:01:49+5:302016-07-10T16:33:35+5:30

भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Video - A flood in Ahmednagar district floods the Mula river | व्हिडीओ - अहमदनगर जिल्ह्यात मूळा नदीला पूर

व्हिडीओ - अहमदनगर जिल्ह्यात मूळा नदीला पूर

ऑनलाइन लोकमत 

अकोले, दि. १० -  भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवार सकाळ सहा वाजेपर्यंतच्या  आकडेवारीनुसार घाटघरला ३६० मिमी तर रतनवाडीला ३१५ मिमी पावसाची नोंद  झाली आहे.
 
हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार आषाढ सरी कोसळत असून मुळे नदीला मोठा पूर आला आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासात एक टी एम सी म्हणजे १ हजार दशलक्षघनफुट विक्रमी  पाण्याची वाढ झाली आहे. 
 
सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे.  तालुक्यात पहाटे पासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून भंडारदरा धरण सायंकाळपर्यंत ४० टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा ८५० दशलक्षघनफुट इतका झाला आहे.

Web Title: Video - A flood in Ahmednagar district floods the Mula river