VIDEO : विरार स्थानकात सिग्नल केबल बॉक्समध्ये आग

By Admin | Updated: August 16, 2016 22:07 IST2016-08-16T19:52:58+5:302016-08-16T22:07:29+5:30

मुंबई उपनगरातील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात सिग्नल केबल बॉक्समध्ये बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

VIDEO: fire in signal cable box in Virar station | VIDEO : विरार स्थानकात सिग्नल केबल बॉक्समध्ये आग

VIDEO : विरार स्थानकात सिग्नल केबल बॉक्समध्ये आग

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबई उपनगरातील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात सिग्नल केबल बॉक्समध्ये आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं. 1 वर संध्याकळी 6.50 वाजता शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे प्लॅटफॉर्म रिकामा करण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा वसईपर्यंतच सुरू करण्यात आल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर लोकल उशिरा आल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
 

Web Title: VIDEO: fire in signal cable box in Virar station