VIDEO : माझगावमध्ये इमारतीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 13:47 IST2016-09-07T13:41:41+5:302016-09-07T13:47:06+5:30
माझगावमधील म्हातारपाखडी विभागातील बंदुकवाला इमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली आहे.

VIDEO : माझगावमध्ये इमारतीला आग
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - माझगावमधील म्हातारपाखडी विभागातील बंदुकवाला इमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मातारपाखाडी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली. गँस सिलींडरचा स्फोटामुळे आगीचा भडका वाढला. सदर इमारत १९५४ साली उभारण्यात आली असून इमारतीत लाकडी बांधकामाचा अधिक वापर असल्याने आग अजूनच भडकत आहे. अर्ध्या तासापासून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश मिळालेले नाही.