VIDEO: कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग

By Admin | Updated: September 15, 2016 14:37 IST2016-09-15T13:34:24+5:302016-09-15T14:37:57+5:30

कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरमध्ये आग लागली आहे. 32 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे

VIDEO: Fire on the 32nd floor of the Hiranandani Tower in Kandivali | VIDEO: कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग

VIDEO: कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरमध्ये आग लागली आहे. 32 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.  सोबतच 4 वॉटर टँकर आणि आणि दोन रुग्णवाहिकादेखील रवाना झाल्या आहेत. हिरानंदानी टॉवर ही कांदिवली पश्चिममधील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर दुपारी 12 च्या सुमारास आग झाली. संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारत रिकामी केली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ही इमारत संपूर्णपणे रिकामी करण्यात आली नसून आतमध्ये कुणीही अडकलेले नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून आग आटोक्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 

Web Title: VIDEO: Fire on the 32nd floor of the Hiranandani Tower in Kandivali