VIDEO : ठाणे पोलिसांच्या फायरिंग प्रॅक्टिसमुळे गावक-यांना मिळतोय रोजगार
By Admin | Updated: October 19, 2016 12:33 IST2016-10-19T10:40:27+5:302016-10-19T12:33:07+5:30
ठाण्यातील येऊर भागात पोलिसांच्या फायरिंग प्रॅक्टिसनंतर उडणा-या गोळयांच्या तांब असलेल्या कॅप्स विकून अनेक गावकरी आपलं पोट भरतात.

VIDEO : ठाणे पोलिसांच्या फायरिंग प्रॅक्टिसमुळे गावक-यांना मिळतोय रोजगार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - शहरापासून बाहेर काही अंतरावर असलेल्या येऊर टेकडी परिसरात शहरातील नवनियुक्त पोलीस फायरिंगची प्रॅक्टिस करतात. आणि त्यांच्या याच प्रॅक्टिस सेशनमुळे आजूबाजूच्या गावक-यांना रोजगार मिळतो.
पोलीस कर्मचारी फायरिंग प्रॅक्टिस करताना ज्या गोळ्या वापरतात त्यांना तांबे असते. त्यामुळे प्रॅक्टिसदरम्यान ज्या गोळ्या उडतात त्या तांब असलेल्या गोळ्या विकल्या की चांगले पैस मिळतात. म्हणून पोलिसांच्या प्रॅक्टिसदरम्यान अनेक गावकरी तेथे येतात व फायरिंग रेंजच्या आसपासच्या परिसरात पडलेल्या या गोळ्यांच्या कॅप्स जमा करतात व त्या विकतात. त्यातूनच अनेकांचा उदरनिर्वाह होतो.