VIDEO : ‘पॉवर ग्रीड’च्या कामासाठी कर्मचा-यांची जिवघेणी कसरत
By Admin | Updated: February 14, 2017 16:13 IST2017-02-14T16:09:19+5:302017-02-14T16:13:52+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 14 - सबस्टेशनला वीज पुरवठा करुन तो शहरांना करण्यासाठी जिल्ह्यातील काही भागात ‘पॉवर ग्रीड’चे काम ...

VIDEO : ‘पॉवर ग्रीड’च्या कामासाठी कर्मचा-यांची जिवघेणी कसरत
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 14 - सबस्टेशनला वीज पुरवठा करुन तो शहरांना करण्यासाठी जिल्ह्यातील काही भागात ‘पॉवर ग्रीड’चे काम करण्यात येत आहे. या कामावर असलेले कर्मचारी चक्क आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवेत अधांतरी लटकत असलेल्या या कर्मचा-यांना पाहून कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढल्याशिलाय राहणार नाहीत.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात हाय व्होल्टेज असलेले भव्य मनोरे उभारण्याचे काम सध्या वीज वितरण कंपनीच्यावतीने सुरू आहे. अतिशय उंच असलेल्या या पॉवर ग्रीडचे काम करत असताना त्यावर विद्युत सप्लाय करणारी तार ओढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844r2w