VIDEO - दरड हटवताना अचानक अस्वल आल्याने उडाली तारांबळ

By Admin | Updated: June 28, 2017 20:08 IST2017-06-28T19:58:41+5:302017-06-28T20:08:46+5:30

ऑनलाइन लोकमत  बुलडाणा, दि. 28 - मलकापूर मार्गावरील राजूर घाटात मंगळवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात ...

VIDEO - Due to the sudden deletion of a bear, a sudden bear blew up | VIDEO - दरड हटवताना अचानक अस्वल आल्याने उडाली तारांबळ

VIDEO - दरड हटवताना अचानक अस्वल आल्याने उडाली तारांबळ

ऑनलाइन लोकमत 

बुलडाणा, दि. 28 - मलकापूर मार्गावरील राजूर घाटात मंगळवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम २८ जून रोजी युद्धस्तरावर सुरु होते. यावेळी बघणा-यांची गर्दी झाली जमलेली असताना, अचानक एक अस्वल त्या ठिकाणी आल्याने उपस्थितांची तारांबळ उडली. 
 
या परिसरात अस्वलाने अनेकदा हल्ले केल्यामुळे काहीवेळाकरिता काम थांबविण्यात आले होते. बुलडाणा शहरापासून ५ किमी अंतरावर असणा-या या राजुर घाटातून मलकापूर- सोलापूर हा मार्ग जातो. २७ जूनच्या सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावरील देवीच्या मंदीराजवळ पहाडाचा काही भाग कोसळून ढिगारा मुख्य मार्गावर आला. पुढे काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग व महसूल विभागाने संयुक्तरित्या आदेश काढून हा मार्ग रात्री ८ वाजतानंतर बंद केला होता. 
 
२८ जून रोजी सकाळी हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. ही घटना पाहण्यासाठी या मार्गावर हजारोच्या संख्याने लोकांनी गर्दी केली होती. या दरम्यान पहाडावरुन एक अस्वल खाली येताना काही लोकांच्या दृष्टीस पडला. यामुळे उपस्थित लोकांमध्ये दहशत निर्माणा होवून एकाच तारांबळ उडाली.
 

https://www.dailymotion.com/video/x8456sn

Web Title: VIDEO - Due to the sudden deletion of a bear, a sudden bear blew up