व्हिडीओ: मद्यधुंद तरूणीचा पोलिस स्थानकात तमाशा, ६ पोलिसांना धक्काबुक्की

By Admin | Updated: June 28, 2016 14:24 IST2016-06-28T12:42:04+5:302016-06-28T14:24:16+5:30

एका अल्पवयीन मद्यधुंद तरूणीने वरळी पोलिस स्थानकात तमाशा करत सहा पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: A drunken teenage police station Tamasha, 6 policeman shocked | व्हिडीओ: मद्यधुंद तरूणीचा पोलिस स्थानकात तमाशा, ६ पोलिसांना धक्काबुक्की

व्हिडीओ: मद्यधुंद तरूणीचा पोलिस स्थानकात तमाशा, ६ पोलिसांना धक्काबुक्की

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ -  एका अल्पवयीन मद्यधुंद तरूणीने वरळी पोलिस स्थानकात तमाशा करत सहा पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. १६ जून रोजी ही घटना घडल्याचे समजते. 
संबंधित तरूणी काही मित्रांसोबत १६ जून रोजी गाडीतून जात असताना पोद्दार रुग्णालयासमोर त्यांच्या गाडीची दुभाजकाला धडक बसून अपघात झाला. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीतील सर्वजण दारु प्यायले असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या सर्वांना पोलिस स्थानकात नेऊन चौकशी सुरू केली असता त्या मद्यधुंद तरूणीने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरवात केला धिंगाणा घातला. एवढंच नव्हे तर तिला शांत करण्याचा प्रयत्न करणा-या ड्युटीवरील पोलिस कर्मचा-यांना धक्काबुक्कीही केली व शिवीगालही केली. तसेच काही कर्मचा-यांचा चावाही घेतला. अखेर महिला पोलिस कर्मचा-यांनी तिला हिसका दाखवत शांत केले. 
 
 

Web Title: Video: A drunken teenage police station Tamasha, 6 policeman shocked